Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

रविवारी (दि.०७) हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपले. अनेक गावांचा संपर्क तुटला. गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली.

दरम्यान, आज सकाळपासून गोदावरीचा पूर ओसरला असला तरीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोदावरी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार वृष्टी झाल्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त वाढ इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत झाली आहे.

दोन्हीही धरणांचे पाणी पुढे नगर आणि मराठवाडयासाठी जात असल्यामुळे नाशिकमधील पावसामुळे औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यातील जनतेलाही दिलासा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!