Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

निफाड तालुक्याला पावसाने झोडपले; सर्वत्र पाणीच पाणी, बळीराजा संकटात

Share

नाशिक/निफाड | प्रतिनिधी 

आज पहाटेच्या सुमारास निफाड तालुक्याला अचानक आलेल्या पावसाने झोडपल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सकाळी शेतात धाव घेतलेल्या शेतकऱ्यांना उभे पिक जमीनदोस्त झाल्याच्या अवस्थेत पाहून रडू कोसळले. तालुक्यातील उगाव व खेडे दरम्यान विनता नदीवरील पुलावरून तीन फुटांवर पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

याठिकाणी बस वाहतूक निफाड मार्गाने पिंपळगावकडे वळवली होती. करंजी खुर्द तामसवाडी संपर्क तुटला बस बंदगोदेगाव- वाहेगाव-भरवसफाटा- जऊळके- वळदगाव गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे.

शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी पावसापुढे हतबल झाले आहेत. पहाटे अचानक आलेल्या पावसाने पिंपळगाव-लासलगावचा संपर्क तुटला तर सारोळे खुर्द येथील शेलू नदीवरील भराव टाकलेला पूल वाहून गेला.

गोंदेगाव परिसरातील राञभर चाललेल्या पावसामुळे गोई नदी व इतर छोटे मोठ्या नाले, ओहोळांना पुर आला होता. या परिसरात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले.

तालुक्यातील सावरगाव परिसर पहाटे 4.30 पासून जोरदार पाऊस सुरू होता. पिंपळगाव बसवंत परिसरात रात्री नऊ वाजेपासून सुरूच होता. मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथे तासभर परिसरात मुसळधार पाऊस झाला.

अर्ध्या तासापासून उगाव व परिसरात जोराचा पाऊस झाला. शेतकरी उध्वस्त.भाऊसाहेब नगर परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोठूरे, तारूखेडले परिसरात मुसळधार पाऊस झाला. तर पिंपळस रामाचे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने प्रचंड हानी झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!