Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

कोल्हापुरात पावसाचे थैमान; नदीकाठी सावधानतेचा इशारा

Share

कोल्हापूर | वृत्तसंस्था

अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगलीत दैना केल्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पावसाचे थैमान घातले आहे. परिसरातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पुन्हा एकदा पावसाचे आगमन या परिसरात झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीकाठी प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. येथील भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, वारणा व दूधगंगा धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. पंचगंगा नदी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे धडकी भरली आहे.

या धरणांतून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू 

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून ७११२ क्यूसेक विसर्ग सुरु आहे.

कुंभीमधून १८००, कासारीमधून १८००, तुळशीमधून १११० विसर्ग सुरू आहे.

वारणामधून ८३०५ व दूधगंगा धरणातून ८८०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.

सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २४ फूट ०३ इंच इतकी असून रात्रीतून ६ इंच वाढण्याची शक्यता आहे.

कोयना धरणातूनही १ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!