Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मालेगावमधील सौंदाणेत १९६९ नंतर प्रथमच उद्भवली अशी परिस्थिती; वस्ती पाण्याखाली, अनेक वाहने वाहून गेली

Share

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव तालुक्यातील शेतकरी पावसाला कंटाळले असून १९६९ मध्ये आलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर यंदाच अशी भयानक परिस्थिती उद्भवली असल्याचे येथील प्रत्येकजण सांगत आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून मालेगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कोठुरे आणि रोझे येथील दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

१९६९ नंतर प्रथमच सौंदाणे (ता. मालेगाव) मध्ये उद्भवली अशी परिस्थिती

*Video : मालेगावमधील सौंदाणेत १९६९ नंतर प्रथमच उद्भवली अशी परिस्थिती; वस्ती पाण्याखाली, अनेक वाहने वाहून गेली**Read More*👇https://www.deshdoot.com/heavy-rainfall-at-saundane-malegaon-breaking-news-latest-news/

Posted by Deshdoot on Saturday, 2 November 2019

तालुक्यातील सौंदाणे, तिसगाव व गिरणारे परिसरात काल (दि.०१) रात्रभर पाऊस सुरु होता. वातावरण नसताना अचानक आलेल्या पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले होते.

प्रथमच सौंदाणे येथील नदीला महापूर आल्यामुळे नदीकाठी असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. तर अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. सौंदाणे शिवारात रात्रभर अतिवृष्टी झाली.

येथील नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे इंदिरानगर व अनेक दुकानात व घरांमध्ये पाणी शिरले. नदीत ट्रक ,मोटरसायकल इंडिका गाड्या वाहून गेल्या तब्बल 50 वर्षांनंतर अशी भयाण परिस्थिती बघितली असल्याचे येथील नागरिक सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!