Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Share
file photo

नाशिक । प्रतिनिधी

पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस (दि. 8 ते 9 ऑगस्ट) या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर कमी झालेला असतानाच आता पुन्हा अतिवृष्टीची शक्यतेने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठयात मोठी वाढ झाल्याने धरणांमधून विक्रमी पातळीवर विसर्ग करावा लागला आहे.

त्यामुळे गोदावरीला महापूर आल्याने संपूर्ण गोदाकाठ परिसर तसेच सायखेडा आणि चांदोरी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात देखील आले. पुरामुळे मोठया प्रमाणात अर्थिक नुकसान झाल्याने नुकसानीच पंचनामेदेखील सुरू झालेले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!