आज दुपारनंतर वाढणार वाऱ्याचा वेग; काळजी घ्या, २४ तास पावसाचा अंदाज

0
नाशिक | सध्या वाऱ्याचा दर ताशी वेग १२ ते १५ किमी आहे. दुपारी तीन वाजेनंतर हा वेग वाढून ४० ते ५० किमी प्रती तास होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांसह इतर शेतीपिकांना तडाखा बसण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली आहे.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, नाशिक तसेच सिन्नर आणि निफाडच्या काही भागातील शेतीपिकांना मोठा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष काढण्याच्या टप्प्यावर आलेले असताना ओखी या चक्रीवादळामुळे काल संध्याकाळपासून नाशिक परिसरातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवेत गारठा असून थंडीत पावसाची भर पडल्याने बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. १५-२० किमी ताशी वेगाने वारे वाहत असल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावलेली दिसून येते आहे.

पहाटेपासूनच नाशिक शहर आणि परिसरात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी थंडीचा आणि पाण्याचा अशी दोन्हीही रेनकोट घालूनच कामाला सुरुवात केली.

LEAVE A REPLY

*