Photo Gallery : गणपती आगमनाच्या दिवशीच त्र्यंबकेश्वरात ‘मुसळधार’

0
त्र्यंबकेश्वर | आज गणेश चतुर्थी. सर्वच गणेशभक्तांनी गणेश आगमनाची तयारी पूर्ण केली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वच गणेश मंडळांनी पावसापासून बचाव होण्यासाठी आधीच मंडप उभारणी करून ठेवली आहे.

आजच्या मुसळधार पावसामुळे ढोल ताश्यांच्या गजरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येथील गणेशभक्त दंग दिसून आले.

आज शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी असल्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने बच्चेकंपनीदेखील आपल्या पालकांसोबत गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी आज शहरात दिसून आली.

२१ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेण्यासाठीदेखील मोठी गर्दी झाली आहे. डीजेवर बंदी घालण्यात आल्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे.

सर्व फोटो : देवयानी ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

LEAVE A REPLY

*