नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; जिल्ह्यात जोरदार पाऊस; गोदावरीला पुरसद़ृश्य परिस्थिती

0
नाशिक । जिल्हयात सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विजांचा कडकडाटात सुरु असलेल्या पावसामुळे शेती पिकांची, घरांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे भरपाई देण्यासाठी आता जिल्हाधिका-यांनी 24 तासात 65 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेल्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

परतीच्या पावसाने सध्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. मात्र हा पाउस शेतीला नुकसानकारक ठरत असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिका-यांनी सर्वच प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि कृषी अधिका-यांना पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत.

पारदर्शीपणे लवकरात लवकर पंचनामे करुन आपला अहवाल सादर करण्याच्याही सुचना त्यांनी दिल्या आहेत. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच तो शासनाला पाठविला जाईल.त्यानंतर पुढील निर्णय शासनाकडून घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाउस होत असल्याने धरणातून विगर्स करण्यात येत आहे. आज दिवसभरही नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली.

अधून मधुन सुर्यनारायणाचे दर्शन नागरीकांना होत होते. आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान जिल्हयात 106.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता.

दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी फ्री कॅचमेंट एरियातून येणारे पाणी थेट गोदेत मिसळत असल्याने गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात 6 हजार 560 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.ं गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री 11 वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता. 5116 क्युसेकने बुधवारी दुपारपर्यंत विसर्ग सुरू होता; दुपारी एक वाजता 4545 क्युसेक तर दोन वाजता 3445 आणि चार वाजता 2874 क्युसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरूवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

LEAVE A REPLY

*