नाशिक शहरात दमदार हजेरी; गोदावरीला पुरसद़ृश परिस्थिती; 8.7 मि.मी पावसाची नोंद

0
नाशिक । गेल्या चार दिवसांपासून जिल्हयात परतीच्या पावसाची दमदार हजेरी लागत असून आजही नाशिक शहरासह जिल्हयाच्या विविध भागात जोरदार पाउस झाला. नाशिक शहरात अवघ्या दोन तासात 8.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात वाढ होत असल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामूळे गोदावरीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे.

सोमवारी दुपारीही शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शहरासह नाशिकरोड , नविन नाशिक , सातपूर , पंचवटी आदि भागाला पावसाने झोडपून काढले. शहरात सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत 8.7 मिलीमीटर पावसाची नाेंंद करण्यात आली तर जिल्हयात 17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

रात्रीही पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पुराचे परिमाण मानल्या जाणारया दुतोंडया मारूतीच्या गुडघ्यापर्यंत पाणीपातळी पोहचली. यंदा मोसमास गोदावरीला पाच ते सातवेळा पुर आला.

धरणातून विसर्ग सुरू : शहरासह ग्रामीण भागामध्येही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पाण्याची आवक वाढली. यामुळे गोदापात्रात एकूण 1793 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू होता.तर दारणा धरणातुन 750 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर आळंदी धरणातून 678 क्यू. , वालदेवी 107 क्यू , नांदूरमध्यमेश्वर 10,779 क्यूसेक विसर्ग करण्यात येत होता होळकर पूलाखालून 4881 क्यू. पाण्याचा प्रवाह सुरू होता.

चोवीस तासात 25 मि.मी पाउस : सोमवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हयात 25 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. यात नाशिक 19 , इगतपुरी 74 , दिंडोरी 40 , पेठ 33 , त्रयंबकेश्वर 34 , मालेगाव 26 , नांदगाव 20 , चांदवड 6.7 र्ें, कळवण 26 , बागलाण 14 , सुरगाणा 13.4 , देवळा 33.7 , निफाड 8.5 , सिन्नर 7 र्ें, येवला 19 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

*