Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पावसाची शहरात दम‘धार’ हजेरी

Share

नाशिक | प्रतिनिधी

चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणार्‍या नाशिककरांना आज मान्सूनने हजेरी लावत सुखद धक्का दिला.तब्बल १७ दिवसांपूर्वी म्हणजेच दि.८ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाने नाशिक शहर व परिसरात विजांच्या कडकडटासह जोरदार हजेरी लावल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर आज (दि.२६)तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचार्‍याची चांगलीच धावपळ झाली.ं जिल्ह्याच्या विविध भागातही कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांंमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आजच्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना आता थोड्या प्रमाणात का होईना सुरुवात होण्यास मदत होणार आहे.

उन्हाळ्यात आणि तो संपल्यांनंतरही प्रचंड उकाड्याने शहरवासीय कमालीचे हैराण झाले होते.मान्सूनपूर्व पावसानेही समाधानकारक हजेरी न लावल्याने व उकाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली होती.दि.८ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाने विजांच्या कडकडाटासह नाशिक शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली.तेव्हापासून मोठा पाऊस गायब झाला होता. अधून मधून पडणार्‍या रिमझिम पावसावरच नाशिककरांना समाधान मानावे लागत होते.मात्र,आज तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ जोरदार पावसाने शहरवासीयांना चांगलेच झोडपून काढले.सकाळपासून प्रचंड उकाडा सहन करणार्‍या नाशिककरांना सायंकाळनंतर पडलेल्या जोरदार पावसानंतर आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता आला.

दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी सहा वाजेला ढग भरून आले आणि तब्बल अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला.रस्त्याने चालताना समोरची वाहनेही काही काळ दिसत नव्हती एवढ्या जोरात हा पाऊस कोसळला.जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांनांही नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.तब्बल सतरा दिवसांपासून ऊनसावलीचा खेळ शहर परिसरामध्ये होता.या काळात प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता.मात्र, आजच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावत शहरवासीयांना दिलासा दिला आहे .पावसामुळे शहर व उपनगरे या भागात मात्र काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला.त्यामुळे शहर अंधारात होते महावितरणचे नियोजन गत वेळेप्रमाणेच आजही पावसाने कोलमडल्याचे चित्र ठिकाणी पहावयास मिळाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!