Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकमध्ये पावसाची संततधार; मोखाड्यानजीक रस्ता खचला, या पर्यायी मार्गाचा वापर करा

Share

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस पडतो आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा परिसरात पावसाची तीव्रता अधिक असून आज येथील रस्ता खचल्यामुळे मोखाडा त्र्यंबक रस्ता खचला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.

या परिसरातील नद्यांना पूर आल्याने घराघरात पाणी शिरले आहेत तर अनेक रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. जव्हारहून मोखाडा येथून पुढे त्र्यंबक-नाशिकला येणाऱ्या  मोरचुंडी नावाच्या पुलाच्या बाजूच्या रस्त्याला भगदाड पडले आहे.

त्यामुळे प्रसंगावधान राखत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जव्हारहून जव्हार फाटा (मोखाडा फाटा) पुलाची वाडी धोंड माऱ्याचीमेट तळवाडा फाटा मार्गे त्र्यंबकेश्वर गाठून पुढे नाशिककडे जाता येऊ शकते. तरी या मार्गाचा वापर करावा अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!