इगतपुरीच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस

0

इगतपुरी : इगतपुरी शहरासह तालुक्यात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

परिसरातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस सुरूच होता त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

यापरिसरात सध्या पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. त्यात अचानक पावसाच्या धारा कोसळल्याने अनेकांची सकाळी चांगलीच फजिती झाली.

LEAVE A REPLY

*