Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : मनखेड, हेमाडपाडा परिसरात संततधार पाऊस; अनेक गावांचा तालुक्याशी तुटला संपर्क

Share

सुरगाणा | प्रतिनिधी

तालुक्यात चार-पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्याना पुर आले असुन पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला असुन शेतीची कामे मंदावली आहेत. मनखेड परिसरात सतत दहा -बारा दिवस सतत संततधार पाऊस पडत असल्याने मनखेड- हेमाडपाडा येथील चिखली (वाजडी) नदीवर सलग दहा-बारा दिवसापासून पुलावरून पुर जात आहे. पुलावरून सतत दहा-बारा दिवस पुर जाण्याचा हे प्रथमच वर्ष आहे. यापूर्वी दोन दिवसापेक्षा जास्त अधिक दिवस सलग पुर गेला नव्हता.

यामुळे हेमाडपाडा, आंबेपाडा(हस्ते) , डोकणीचा पाडा, जाहुले, सुकतळे, मनखेड, या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अतिपावसामुळे शेतीच्या कामांचा वेग मंदावला आहे.

अशा पावसात बैल घेऊन नांगरणी करता येत नाही की चिखल करता येत नाही. शेतातून खुप पाणी जात असुन भाताचे रोप लावता येत नाही तसेच रोप लावले तर ते अति पावसामुळे वाहून जाईल त्यामुळे अनेक शेतकरी घरीच थांबले आहेत. शेतकरी बांधव सतर्कतेत असल्यामुळे या परिसरात अदयाप कोणतीही नुकसान झालेली नाही.

संततधार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्याना पुर आला असुन मनखेड परिसरात सलग दहा दिवसांपासून चिखली नदीवरील पुलावरून पुर जात आहे. अद्याप कोणतीही घटना घडली नसुन नागरिकांनी पुर बघण्यासाठी किंवा पुलावरून जाऊ नये. शेतात जाताना काळजीपुर्वक जावे. काही घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे.

दीपक भोये, अध्यक्ष, नवसंकल्प एकता परिषद महाराष्ट्र, दिंडोरी प्रमुख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!