Video : नाशिकमधील द्राक्षबागा संकटात; परतीच्या पावसाने शेतकरी चिंतेत

0
नाशिक | परतीच्या पावसाने जिल्ह्याभरात थैमान घातले आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये यंदा परतीच्या पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. आज निफाड तालुक्यातील कोराटे, कसबे सुकेणे परिसरात मुसळधार पाऊस पडला.
खरिपाच्या अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. आजच्या पावसामुळे द्राक्षबागेला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसला असून मोठे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.
द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवसांतून २-३ वेळा फवारणी करत आहेत. वातावरण बदलाचा अतिरिक्त भार या शेतकऱ्यांवर पडणार आहे.

 

LEAVE A REPLY

*