नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले

0
नाशिक | नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यातील काही गावे, सिन्नर, येवला, निफाड, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात आज परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

जिल्ह्यातील उगाव व परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले असून यंदा द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मौजे सुकेणे व कसबे सुकेणे, कोठुरेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तरओझे येथे जवळपास एक तास मुसळधार पाऊस पडला.

वनसगांव व परीसरातील ब्राम्हणगाव, सारोळे, खानगाव, कोटमगाव, थेटाळे आदी गावांना परतीच्या पावसाने धो धो धुतले. द्राक्ष उत्पादक भयभीत ,छाटणी झालेल्या व पोग्यात द्राक्षबागा असणा-या द्राक्षउत्पादकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

खानगाव नजिकला प्रल्हाद डुंबरे यांच्या द्राक्षबागेत पावसाचे गल्लीत साचलेले पाणी.

LEAVE A REPLY

*