नाशकात पावसाची दमदार हजेरी; दिवाळी खरेदी पाण्यात

0
नाशिक | नाशिकमध्ये आज चौथ्या दिवशीही दुपारी पावसाने दमदार हजेरी लावत सगळीकडे तारांबळ उडवली. कालच्या मुसळधार पावसानंतर आज सकाळी काहीश्या प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. पावसामुळे रखडलेली दिवाळीची खरेदी करण्यासाठी आज सकाळपासूनच रविवार कारंजा, मेन रोड, एमजीरोडला गर्दी झाली होती.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने सर्वत्र दैना केली. वीजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन झाले. दिवाळी खरेदीसाठी आलेल्या अनेकांना आजच्या पावसाने ओले चिंब केले.

शहरात मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड परिसर, रामकुंडाकडे जाणारा मार्ग, अशोक थिएटर परिसरात दिवाळीसाठी आकर्षक वस्तू विक्रीला ठेवले आहेत याठिकाणी सर्वात जास्त गर्दी दिसून आली. आजच्या पावसाने येथील सर्वांचीच तारांबळ उडवली.

गंगापूर धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण झाल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग केला जात असून हा विसर्ग आज सायंकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दररोज दुपारी पावसाचे आगमन होत असल्याने व्यावसायिकांच्या दिवाळी व्यवसायावर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता पाऊस नको असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे नाशिकमधील व्यावसायिक सांगू लागले आहेत.

LEAVE A REPLY

*