Photo Gallery : नाशकात पावसाची संततधार; इगतपुरीत सर्वात जास्त पाऊस

0
नाशिक | नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

अनेक धरणांतून हजारो क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. आजच्या पावसाच्या ताज्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे.

आज इगतपुरी तसेच त्र्यंबक परिसरात जर पावसाचे प्रमाण अजून वाढले तर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

आज रविवारची सुट्टी असल्यामुळे सोमेश्वर, बालाजी मंदिर, नवश्या गणपती परिसरात हजारो नाशिककरांनी भेट दिली. अचानक आलेल्या पावसाने नाशिककर ओले चिंब झाले होते. अनेकांनी सेल्फी काढून सोशल मिडीयावर आजचा पाऊस पोस्ट केला.

पावसामुळे शहराच्या काही भागात बत्ती गुल झाली होती.

नाशिक जिल्ह्यातील आज सकाळपर्यंत असलेली आकडेवारी.

Rainfall report Date 27/08/2017

1. Nashik 1.0/965.0
2. Igatpuri 27.0/3314.0
3. Trymbak 7.0/2034.0
4. Dindori 10.0/716.0
5. Peth 15.0/2151.4
6. Niphad 4.8/341.4
7. Sinnar 0.0/457.0
8. Chandwad 0.0/356.9
9. Deola 0.0/274.4
10. Yeola 0.0/331.0
11. Nandgaon 0.0/481.0
12. Malegaon 1.0/245.8
13. Baglan 0.0/271.5
14. Kalwan 5.0/519.0
15. Surgana 45.2/1949.7

Total 116.0 mm/14408.1 mm

Today’s dist average 7.73 mm
Total dist average 960.54 mm

सुधारित आकडेवारी लवकरच देण्यात येईल.

आजच्या पावसाचे शहरातील काही फोटो :

LEAVE A REPLY

*