Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

Video : दुतोंड्या मारुतीच्या मानेला पाणी; नाशिककरांची पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी

Share

 नाशिक | प्रतिनिधी 

मागील दीड आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने शहर व जिल्हा परिसरात हजेरी लावली. शहरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सकाळी गंगापूर धरणातील विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे गोदाघाटावर पूरपरिस्थिती होती. दुतोंड्या मारुतीच्या मानेला पाणी लागले तर रामसेतू पुलालाही पाणी लागले आहे.

यामुळे गोदेला पूर आला असून असंख्य नाशिककर आणि पर्यटकांनी गोदातीरी पाणी बघण्यासाठी गर्दी केली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस ऑगस्टमध्येही दमदार बॅटिंग करत आहे. शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यात 193 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

तर, इगतपुरी तालुक्यात 157 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. तसेच, इतर तालुक्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.

गोदावरीला पूर; दुतोंडया मारुतीच्या मानेला पाणी

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून आज सकाळी सात वाजता 11 हजार 358 क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला.

त्र्यंबकमध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणातील साठ्यात वाढ होत होती. दारणा धरणातून १९  हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे दुष्काळाने मागील चार महिने होरपळून निघालेल्या जिल्हावासियांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरीदेखील सुखावला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!