Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात मुसळधार; द्राक्षउत्पादकांना धास्ती, वीज पडून महिला गंभीर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सकाळपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर आज आज सायंकाळी नाशिक शहरासह दिंडोरी, निफाड आणि सिन्नर तालुक्याच्या काही भागास पावसाने चांगलेच झोडपले. दिंडोरीत गारांचा पाऊस झाल्याने ऐन छाटणी झालेल्या द्राक्षबागायित दारांनी धास्ती खाल्ली आहे. तर ननाशी येथे वीज कोसळून एका महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दिंडोरी तहसीलदर यांनी दिली आहे.

दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथे झालेल्या परतीच्या पावसाने सुमारे तासभर जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटात प्रचंड पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून येथील शेतकरी गणेश शिवाजी इचाळे यांच्या शेतातील बैलावर विज पडुन बैल जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. तर शिंदवडला पुर परिस्थिती निर्माण झाली होती. ओझे, म्हैळूस्के, कादवा माळूगी, करंजवण येथे जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

तिकडे सिन्नरमध्ये अचानक आलेल्या पावसाने अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ मुक्काम ठोकत सकाळपासून होत असलेल्या उकाड्यापासून दिलासा दिला. दरम्यान, बऱ्याच वेळ याठिकाणी पावसाची रिपरिप सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली आहे.

इगतपुरीमध्ये आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच, त्र्यंबक आणि नाशिक शहर परिसरातही पावसाची मुसळधार बघायला मिळाली. सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या पावसाने दाणादाण उडवली होती. रस्त्यांवरून अक्षरश: पाण्याचे पाट वाहताना नजरेस पडले.

तळेगांव दिंडोरी परिसरात गारा

तालुक्यातील तळेगाव दिंडोरी परिसरात आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. झाडे उन्मळुन पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडुन पडल्या आहेत. तळेगांव येथिल यशवंत नगर जवळील असलेल्या नाशिक दिंडोरी रस्त्याला टाकलेल्या मोर्‍यांवरुन पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे नाल्यांना अचानक पुर आल्याने पुराचे पाणी शेतीपिकांमधुन गेल्याने पिके पाण्यात भिजली आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ऐन बहरात आलेला टोमेटो पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

निफाड तालुक्यात पावसाच्या सरी

मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथे परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झालेली असताना जवळपास एक तासभर पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. छाटलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर बागांवर पाणी असल्याकारणाने फवारणी करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!