Video : गाडगे महाराज पुलाखाली गाडी अडकली

0
नाशिक | गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी गोदावरीत वाहत आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाणी अचानक वाढल्यामुळे गंगाघाटावरील गाडगे महाराज पुलाच्या खाली उभे असलेले चारचाकी वाहन पाण्यात अडकले.

आपत्ती व्याव्साथापन कक्ष आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानीक नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या जवानांचे हे वाहन काढण्याठी अथक प्रयत्न सुरु होते. अखेर एक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहन बाहेर काढण्यात यश आले.

गंगापूर धरणक्षेत्रात सुरु रात्रीपासून सरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणामधून दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची संततधार सुरूच राहिल्यास धरणासाठा वाढून गोदावरीत विसर्ग होण्याची शक्यता आहे.

Video :

LEAVE A REPLY

*