Live Blog : नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

0

नाशिक | नाशिक जिल्ह्यात पहाटे दोन वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोदावरीला पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून परिसरातील बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक दिवसांपासून बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत होता. अखेर वरूनराजा आज बरसला आणि शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला.

गोदावरीच्या  पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे  सांगितले जात आहे. नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रामकुंडाजवळील दुतोंडया मारुती बुडाला की गोदावरीला पूर आला असे समजतात. आजच्या पावसाने रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले होते.

शहरातील सराफ बाजारासह अनेक दुकानात पाणी शिरल्याची माहिती प्रतिनिधीने दिली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असून संततधार सुरु आहे.

पंचवटीतील मनपा विभागीय कार्यालयासमोर लिंबाचे मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे वाहनांचे नुकसान झाले. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.

नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार गंगापूर धरणात ४५ टक्के पाणी असून आज झालेल्या पावसाची पाणी नदीत गेल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामध्ये गटारींचे पाणीदेखील मिसळल्यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरली होती.

याशिवाय जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, निफाड आदी भागात पावसाची संततधार सुरू असून वाघाडी नदीला पूर आल्याने काही भागाचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या अपडेट्स

देवळा तालुक्यात रिपरिप

(प्रतिनिधी – बाबा पवार) |  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्या कारणाने बळीराजा विवंचणेत सापडला होता. मात्र काल पहाटे पासुन पावसाच्या हलक्या सरी अधुन मधुन तालुक्यातील अनेक भागात बरसल्या तर आज मध्यरात्री पासुन पावसाची संथगतिने सततधार सुरु आहे. याच कारणामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सध्या तरी दुबार पेरणीचे संकट टळणार असल्याने शेतकरी राजा सुकावला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मानसुनपुर्व व मानसुनचा पाऊस समाधानकारक पडला होता मात्र देवळा तालुका त्यास अपवाद होता. मानसुनचा फक्त एकच पाऊस पडला त्या नंतर आजपर्यंत पाऊस जनु गायबच होऊन गेला होता. एकाच पडलेल्या पावसाच्या थोड्याफार झालेल्या ओलवरती बहुतांशी शेतकर्‍यांनी पेरण्या उरकल्या तर तालुक्यात काही ठिकाणी अजुन पाऊसा अभावि पेरण्या बाकी आहेत.

पेरणी केलेल्या पिके पावसाअभावी सुकू लागली होती व दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र काल दिवसभरात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या तर आज मध्यरात्री पासुन संथपणे पावसाची सततधार सुरु आहे. या कारणामुळे पिकांना संजिवणी मिळाली आहे. परिणामी पिकेही शेतकऱ्याप्रमाणे आनंदाने डोलु लागली आहेत. तर परिसरात अजुन पाऊस पडण्यास वातावरण पोषक दिसत आहे.

 

 

 

सायखेडा, त्र्यंबकेश्वर, कसबे सुकेणे मनमाड येथील काही व्हिडीओ

 

 

LEAVE A REPLY

*