Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

नाशिकमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

नाशिक शहरासह परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे १० मिनिटांत रस्ते जलमय झाले होते. विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला.

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरात पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा अगोदरच हवामान खात्याने दिला होता. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे. शुक्रवारी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे रस्त्यावरील दुकानदार व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या