Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची कोसळ’धार’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना आज दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. सीबीएस, त्र्यंबकनाका, शालीमार, रविवार कारंजा, गोदाघाटावर अचानक आलेल्या पावसामुळे काहीशी धावपळ उडाली होती. मान्सूनचा पाऊस झाल्याचे अनेकांनी सांगितले मात्र, हवामान अभ्यासक सांगतात की, १ जुलै नंतरच मान्सून दाखल होणार असून ८० टक्के शेत ओले झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

आज अचानक आलेल्या पावसाने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांनी झाडे आणि दुकानांच्या आडोशाला उभे राहून भिजण्यापासून बजाव केला. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेकजन पावसात भिजत ‘पाऊस पडू दे’ अशी साद घालताना दिसून आले.

नदीनाले आजच्या पावसाने तुडुंब भरून वाहत होते. गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे काहीशा प्रमाणत धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमजीरोड येथे चेंबर साफ न केल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी कालही आलेल्या पावसामुळे अशीच परिस्थिती होती.

हवामान खात्याने येत्या २४ तासात दमदार पावसाचे आगमन होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्याआधीच नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

नाशिक शहर आणि परीसरासोबतच मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

सापुतारा परिसरात रिमझिम पाऊस

सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सिमेवर दुपारी ३. वाजेच्या पावसाने हजेरी लावली. आजच्या पावसाने बळीराजा सुखावला असून लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. शेतकरी मुसळधार पावसाची गरज होती मात्र, ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात चालत राहिला तरी पेरणीसाठी पूरक ठरेल असे येथील शेतकरी वर्ग सांगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जोरादार पाऊस नसल्याने पेरण्या, खोळंबल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!