Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये मुसळधार; रस्ते पाण्याखाली, अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळाले. सकाळपासून वातावरणात जाणवत असलेला उकाडा सायंकाळच्या पावसाने नाहीसा केला. अचानक आलेल्या पावसामुळे रविवार कारंजा, मेन रोड, सीबीएस, शालीमार परिसरात जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळाले. शहरात पावसाचे आगमन होताच नेहमीप्रमाणे विजेची बत्ती गुल झाल्याने नाशिककरांनी महावितरणवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.

पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे नाशिककरांची एकच तारांबळ उडाली होती. शहरातील सराफा बाजारात पाणी शिरल्याने उद्भवलेल्या स्थितीचा सामना करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले.

शालीमारमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांनी दुकानांच्या आडोशाला उभे राहून पावसापासून बचाव केला. तळपत्या उन्हाचा महिना म्हणून ऑक्टोबर महिन्याकडे बघितले जाते. या महिन्यात वाढलेले ऊन सर्वांनाच त्रासदायक ठरते मात्र, यंदा अजून परतीचा पाऊस सुरुच असल्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवत नसल्याचे चित्र आहे.

#Nashik परतीच्या पावसाची जोरदार बॅटींग

Posted by Deshdoot on Wednesday, 30 October 2019

आजच्या पावसाने शहरातील विविध रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वादळ वारे नसतानाही महावितरणची बत्ती गुल झाल्यामुळे नाशिककरांनी सोशल मीडियात महावितरणचे वाभाडे काढले.

दरम्यान, सिन्नर तालुक्यातही आज दुपारी वादळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाड, येवला, दिंडोरी, चांदवड, इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांनाही पावसाने झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!