मुंबईत दमदार पाऊस; नाशिकमध्येही शक्यता; मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतुक कोलमडली

0

नाशिक, ता. २७ : मुंबईत अजूनही जोरात पाऊस सुरूच असून पावसामुळे लोकलसह मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

त्यामुळे नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.‍

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर पुन्हा वाढला. परिणामी मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचले.

मुंबईत हिंदमाता परिसरासह दक्षिण मुंबईच्या अनेक भागात पाणी तसेच रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले आहे.

तुफान पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल खोळंबली आहे.

मध्य रेल्वेवरील लोकल 30 मिनिट, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.

दरम्यान शनिवारी सक्रीय झाल्यानंतर आज पुन्हा नाशिक शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ॲक्युवेदर संकेतस्थळावर वर्तविण्यात आली आहे.

तर कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

वर्ध्यात रात्रभरापासून तुफान पाऊस सुरू आहे. वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*