Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

Video : मुंबईत पावसाचा हाहाकार; रेल्वे रद्द, शाळांना सुट्टी जाहीर

Share

मुंबई  | प्रतिनिधी

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्सव सुरू असताना आज पुन्हा एकदा पावसाने मुंबईत हाहाकार माजवला आहे. संततधार पावसामुळे  मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि राज्यातील इतर भागात त्रेधातिरपीट उडवली. मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेत दिलासा दिला असला, तरी आजही मुंंबई, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा मात्र दिला आहे.

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी, गोदावरी, राज्यराणी व तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ पुणे रेल्वेही रद्द करण्यात आली आहे.

मुंबई पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकली असून मिठी नदीमधील पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरात पाणी साचले होते. यामुळे रस्त्यावरही गुद्घ्यापेक्षा अधिक पाणी होते. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अजूनही मुंबई पूर्वपदावर आलेली नाही.

प्रसंगावधान राखत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर नाशिकहून दररोज मुंबईसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अघोषित सुट्टी घ्यावी लागली आहे.


नाशिकच्या प्रवाशांना पुण्याच्या धर्तीवर सवलत मिळावी

पावसाळा सुरु असून मुंबईवर नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला सहकार्य करू पण मुंबई ठप्प झाल्याची गेल्या दोन महिन्यातील ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे नाशिकच्या चाकरमाण्यांना त्याचा नेहमीच त्रास होतो. कार्यालयीन व्यवस्थापन अघोषित सुट्टी घेतलेल्या प्रवाशांच्या अडचणी समजून घेत नाही. तसेच पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांना अर्धा तास सवलत मिळते तशी नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांना कुठलीही सवलत मिळत नाही.

राजेश फोकने, रेल्वे सल्लागार समिती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!