Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबईत पावसाचा हाहा:कार; विमानसेवा, रेल्वेसेवा विस्कळीत

Share

मुंबई : मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. मुंबईतल्या पावसाचा फटका येथील विमानसेवेला झाला असून सात पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

मुंबईसह उपनगरात शनिवार मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा, कुर्ला या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.

सायन, परळ येथील सखल भागांत पाणी साचले आहे. बदलापूर-अंबरनाथ येथे पावसाचा हाहा:कार सुरू आहे. उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागल्याने वांगणी, बदलापूर, अंबरनाथ परिसरात पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर आणि कर्जत-खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!