Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

मनमाडमध्ये हाहाकार; मध्यरात्रीत कोसळलेल्या जलधारांनी बळीराजा अधिक संकटात

Share

मनमाड (प्रतिनिधी): मनमाड शहर परिसरात पावसाचा हाहाकार रात्रभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगूळणा व पांझण या दोन्ही नद्यांना पूर आले असून नद्यांना खेटून असलेला वसाहतीत पुराचे पाणी शिरले आहे.

टकार मोहोल्ला परिसर,गुरुद्वाराच्या पाठी मागची वस्ती, इदगाह परिसरातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले तर पुरात काही टपऱ्या वाहून गेल्या नद्यांना रात्री अचानक पूर आल्यामुळे नदी काठच्या वस्ती मधील लोकांमध्ये एकच खळबळ उडून भीती पसरली परिसरातील अनेक तरुण मदतीसाठी धावून आले व त्यांनी आपले जीव धोक्यात घालून घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

त्यामुळे जीवित हानी झाली नसली तरी अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या.मनमाड हे पाणी टंचाईचे माहेरघर म्हणून ओळखले जाते येथे मुसळधार पाऊस होऊन नद्यांना पूर येईल असे कोणालाही स्वप्नात देखील वाटले नव्हते मात्र यावर्षी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असून त्याला मनमाड शहर देखील अपवाद ठरले नाही गेल्या काही दिवसांपासून सलग होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेचा बंधारा आणि वागदरडी धरण ओवर फ्लो झाले.

त्यामुळे तब्बल 12 वर्षा नंतर दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!