Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कोल्हापुरात मुसळधार; हजारो घरात अंधार, पाणीपुरवठादेखील झाला नाही

Share

कोल्हापूर | वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. पाणी उपसा केंद्रातही पाणी शिरल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहराजवळून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरही पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्वेकडील बाजूने सुरू ठेवण्यात आली असल्याचे समजते. पुण्याहून कोल्हापूर-बेळगाव आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. या बरोबरच गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पांगिरे फाट्याजवळील पूलही कोसळल्याने वाहतुक वळविण्यात आल्याचे समजते.

मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले आहे. धरणाच्या आपत्कालीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग होत असून जिल्ह्यात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!