Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कोहोर परिसरात पावसाचे थैमान

Share
कोहोर | वार्ताहर 
पेठ तालुक्यात पावसाची संततधार  सुरु असुन प्रामुख्याने धरण क्षेत्रात जोर अधिक वाढला आहे. गत आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील छोट्या-मोठ्या धरणामध्ये पाण्याची वाढ होत आहे. कोहोर परिसरात पाझर तलावे ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
काही दिवसापूर्वी तालुक्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने पून्हा हजेरी लावली. तालुक्यातील कोहोर, करंजाळी, कुळवंडी, जोगमोडी व कुंभाळे परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. संततधार कायम असून असल्याने दमनगंगा व परिसरातील लहान-मोठ्या नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!