खडांगळीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार; गायीचा मृत्यू

0
नाशिक | खडांगळी परिसरात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या पावसात वीज कोसळून येथील एका गाईचा मृत्यू झाला आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटासह पावसाचे रौद्ररूप आज सिन्नर तालुक्यात दिसून आले.

दरम्यान परिसरात वीज कोसळून खडांगळी शिवारातील प्रगतशील शेतकरी सुभाष कारभारी ठोक यांची घरासमोर बांधलेली गाय दगावली असून, यात त्यांचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे.

ऐन पिक कापनीच्या मोसमात आलेल्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अर्धातास झालेल्या या पावसामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गाची चागंलीच तारांबळ उडाली होती. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतातील उभी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

अगोदरच शेतकरी कर्जबाजारी असतांना त्यातच अचानक झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीच्या सणापुर्वीच शेतकऱ्यांवर  चिंतेचे सावट पसरले आहे.

LEAVE A REPLY

*