Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

अकोले व संगमनेर परिसरात जोरदार पाऊस

Share

अकोले / संगमनेर (प्रतिनिधी)- अकोले शहर व परिसरात तसेच संगमनेर परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून जोरदार पाऊसास सुरुवात झाली. विजांचा कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आहे.

मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाने हुलकावणी दिली आहे. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

शेतकरी राजा गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होता. या पावसाने थोड्याच वेळात रस्त्यावर पाणीच पाणी साठले होते.

अकोले शहरासह कळस बुद्रुक, सुगाव, कुंभेफळ, सुगाव, गर्नी, उंचखडक, टाकळी, इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी आदी प्रवरा परिसरातील गावांत हा पाऊस सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने विश्रांती दिली आहे.

आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा, सावरचोळ,  मेंगाळवाडी , नांदुरी दुमाला, धांदरफळ परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतकरी वर्गाला या पावसाने काहीसा दिलासा दिला.

संगमनेर शहर, गुंजाळवाडी, सुकेवाडी आदी परिसरातही मुसळधार पाऊस झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!