Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पावसाची दुसऱ्या दिवशीही जोरदार ‘बॅटिंग’

Share

नाशिक | देशदूत डिजिटल चमू

आठवड्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुसऱ्या दिवशीही दमदार ‘बॅटिंग’ केली आहे. निफाड दिंडोरी आणि नाशिक शहर परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड परिसरात नदीनाले तुडुंब भरून वाहत होते. तर जोपूळ – पिंपळगाव रस्त्यावर धमनवाडी फाट्यावर तासाभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुलावरून पाणी गेल्यामुळे काही काळ याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथे मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तालुक्यातील रानवड, कुंभारी, पालखेड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुसळधार पावसासाठी सध्या पोषक वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्र वगळता इतरत्र जोरदार पाऊस बरसणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता नसून तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!