Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; सतर्कतेचे आवाहन

Share
file photo

पुणे | प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात उत्तर-पूर्व भगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बांगलादेश किनारपट्टीजवळ आहे. याच किनार पट्टीवर हवेच्या वरच्या  भागात कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे.

तो पश्चिम उत्तर भागाकड़े सरकणार  असून त्याची तिव्रता वाढणार आहे. त्याचबरोबर गेल्या चार -पाच दिवसांपासून   गुजरातच्या  किनारपट्टीपासून लक्ष्यद्वीप बेटापर्यंत द्रोनिय स्थिती निर्माण झालीय. याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस (दि.14 पर्यंत) दक्षिण आणि उत्तर माध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा , पुणे, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा अंदाज  हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपासून दक्षिण मध्यमहाराष्ट्रातील घाटमथ्यावर बरसणारा पाऊस थांबला होता. आता मात्र पुन्हा एकदा सलग तीन  दिवस (दि.14)कोल्हापूर, सातारा आणि पुणे भागातील घाटमथ्यावरील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

याबरोबरच उत्तर मध्यमहाराष्ट्रातील नाशिक भागातील घाटमाथा,कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ह्जेरी लावणार आहे, विदर्भ आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी तुरळक प्रमाणात मुसळधार पाऊस हजेरी लावले.  असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे .उर्वरित भागात मात्र केवळ हलक्या सरी पडतील

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूर, या जिल्ह्यात पुढील दोन दिवसात अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. दक्षिण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे .

विशेषत: मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली भागात काही ठिकाणी मुसळधार तर कोकणातील पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील तीन दिवस बरसणार आहे. मात्र 16 ऑगस्ट नंतर राज्याच्या सर्वच भागातील पाऊस पूर्णत: कमी होईल असाही माहिती हवामान शास्त्र विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी  यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!