Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; सुट्टी जाहीर

Share

मुंबई | प्रतिनिधी 

कालपासून मुंबईत पावसाची मुसळधार सुरूच आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे.  सोमवारी पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला. मुसळधार पावसामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून मध्य रेल्वेने कुर्ला ते ठाणे दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सर्वत्र पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी ही सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना सुट्टी असेल

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकणातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेची काळजी करू नये असे सांगत आज परीक्षा असेलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

मुंबईत पावसाची स्थिती बघता सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी ही सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना सुट्टी असेल… मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकणातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर… #MumbaiRains

— Deshdoot (@deshdoot) July 2, 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!