Friday, April 26, 2024
HomeनाशिकGallery : नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकमध्ये अवकाळीची दाणादाण; झाडे कोसळली, गारपीटीने शेतकऱ्यांना...

Gallery : नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकमध्ये अवकाळीची दाणादाण; झाडे कोसळली, गारपीटीने शेतकऱ्यांना फटका

नाशिक | देशदूत डिजिटल चमू

नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर अनेक वाहनांचे नुकसानही यामुळे झाले. दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली तर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलसह परिसरात पावसाने दाणादाण उडवली.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागाला आज पाऊस व गारपिटीने झोडपले असून करोना नंतर गारपिटीच्या संकटाने शेतकरी धास्तावला आहे. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली. वादळ प्रचंड असल्यामुळे अनेक ठिकाणी गारा पडल्या. त्यानंतर अनेक भागात गारांचा ढीग पडलेला दिसून आला. तालुक्यातील पांडणे, अहिवंतवादी, चौसळे, हस्ते, पिंपरी अचला, देवसाने, पुणेगाव आदी परिसराला गारांनी झोडपले.

तालुक्यातील उमराळे, नाळेगाव, गोळशी, ननाशी, जांबुटके आदी परिसरात मुसळधार पाऊस झाला. दिंडोरी शहर परिसरात पाऊस पडला. करोनामुळे लोक घरात होते. पण पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले.

उमराळे येथे गारांचा पाऊस पडला. सकाळपासून पावसाचे लक्षण होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यांनतर दुपारी चार वाजता अहिवंतवाडी गटाला पावसाने झोडपले.

पाऊस सरकत सरकत उमराळे परिसरात गेला. तेथेही गारपीट झाली. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांना पावसाचा फटका बसला आहे. कारले, फ्लॉवर, कोबी, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून करोना पाठोपाठ पावसाचे संकट असल्यामुळे शेतकरी धास्तवाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या