Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

फुलेनगरला मतदान केंद्रांवर अचानकगर्दी वाढली; सायंकाळी मतदानाचा टक्का वाढणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीवरच गेली आठवडाभरापासून पावसाचे सावट होते. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळीच पावासाने हजेरी लावल्याने मतदानावर परिणाम झाला. याची मोठी धास्ती उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली मात्र साडेदहा नंतर बहूतेक भागात पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा सर्वांना दिलासा मिळून मतदानाची टक्केवारीत वाढ झाली. तर शहरातील फुलेनगरमधील अचानक गर्दी वाढल्याने याठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या, अचानक गर्दी का वाढली असावी यावर चर्चांना याठिकाणी उधान आले होते.

विधानसभा निवडणुक जाहिर होण्याच्या दरम्यान राज्यातून पाऊस संपल्याचे चित्र होते. तसा हवामान खात्याने अंदाजही व्यक्त केला होता. परंतु निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच पावसाने आपला रंग दाखवला.

राज ठाकरे यांची पुण्यातील पहिलीच सभा पावासामुळे रद्द करण्याची नामुश्की मनसेनेच्या उमेदवारांवर ओढवली. यानंतर अनेक पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा पावासाने उधळून लावल्या. तर अनेक नेत्यांच्या हेलिकॉप्टरलाही झटके दिले होते. या सर्वातून सर्व यंत्रणेने तोंड दिले असताना आज होणार्‍या मतदानावरही पावसाचे मोठे संकट होते. पाऊस जोरात आला तर मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्यास काय असा मोठा प्रश्न प्रशासन तसेच उमेदवार, त्यांचे कार्यकर्त्यांना पडला होता.

आज सकाळी 7 वाजेपासून बहूतांशी ठिकाणी मतदानास सुरूवात झाली. नेमका आज सकाळपासूनच पावसाने रिमझीम स्वरूपात आपली हजेरी लावली. यामुळे तर उमेदवारांच्या मनात धस्स झाले. परिणामी सकाळच्या सत्रात बहूतांश ठिकाणी अवघे 2 ते 4 टक्के मतदान होते. लवकर मतदान करून कामावर जाणारेच मतदार सकाळी मतदानासाठी दिसत होते. मध्य शहरातील अनेक बुथ सकाळी साडेनऊ पयर्ंत ओस पडल्याचे चित्र होते.

मतदानाची काळजी वाढल्याने अनेक उमेदवारांनी मतदारांना बाहेर काढण्यााठी उपायोजना सुरू केल्या होत्या. अनेकांनी चारचाकी तसेच मोठी वाहने तयारीत ठेवली होती. परंतु हळूहळू साडेदहा नंतर पाऊस कमी होत गेला. तर अकराच्या दरम्यान पुर्ण थांबला. यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले. पावसाचा मोठा दिलासा मिळाल्याने उमदेवारांचाही जीव भांड्यात पडला.

झोपडपट्टी परिसरातील मतदार मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत फिरकले नव्हते. दरम्यान, अचानक साडेतीनच्या सुमारास या मतदारांनी बूथवर मतदान करण्यासाठी गर्दी केल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अचानक झालेल्या गर्दीमुळे मतदानाच्या टक्केवारीत मात्र काहीशी भर पडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!