दोन वर्षांच्या मुलीसोबत वडील कबरीत झोपले त्याची हृदयद्रावक गोष्ट

0

बीजिंग, ता. २८ : थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या दोन वर्षीय मुलीवर उपचार करणे अशक्य झाले तेव्हा हतबल झालेला बाप तिच्यासोबत एका कबरीत झोपला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि या मुलीसाठी लाखो रुपयांच्या मदतीचा ओघ सुरू झाला.

ही हृदयद्रावक गोष्ट आहे, चीनमधील सिचुआन प्रांतातली. दोन वर्षीय हँग झिनलेई हिला थॅलेसेमिया झाल्यानंतर तिच्या मातापित्यांनी सुमारे १४ लाख रुपये खर्च करून तिच्यावर उपचार केले.

पण जवळचे पैसे संपल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर काहीच पर्याय नव्हता.

दरम्यान तिच्या मृत्यूची मानसिकता तयार करण्यासाठी तिचा बाप नेजिंग हा तिला जवळच्या कब्रस्तानात घेऊन जाऊ लागला.

तिची आई डेंग मिन हिने त्याचा व्हिडिओ काढला. चीनमधील सोशल मीडियावर टाकल्यावर १६ कोटी लोकांनी तो पाहिला. अनेकांनी मदतीचे प्रस्ताव दिले.

चीनमधील सर्वात मोठ्या सार्वजनिक मदत संकेतस्थळावरही त्यांनी आवाहन केले. त्यांच्याकडे सुमारे ११ लाख रुपये जमा झाले.

आपल्या मुलीवर उपचार करता यावे म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचे ठरविले आहे.

या मुलाची नाळ जतन करून दोन वर्षीय मुलीवर उपचाराचा त्यांना मानस आहे. त्यासाठी सुमारे ७० हजार अधिक ऑपरेशनचा खर्च वेगळा असा खर्च होणार आहे.

सोशल मीडियामुळे त्यांची हतबलता संपून मुलीच्या जगण्याची नवी आशा त्यांना दिसू लागली आहे.

चीनमधील पिपल्स डेलीने हे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

*