निरोगी कुटुंब हीच मोठी संपत्ती : पवार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्याजवळ किती संपत्ती आहे? त्यापेक्षा आपल्या घरातील सदस्य निरोगी असणे ही मोठी संपत्ती आहे. आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले नसेल तर सातवा वेतन आयोगच काय चौदावा वेतन आयोग मिळाला तरीसुद्धा उपयोग नाही, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व योजना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
अहमदनगर येथील श्रीराम चौकात साईशान स्वस्त औषधी सेवा या जनेरिक औषधी दुकानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता मनोहर पोकळे होते. आमदार संग्राम जगताप, सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे,
जनेरीक कार्टचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पुलाटे, नगरसेविका उषाताई नलवडे, यु.काँ.चे सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उपकार्यकारी अभियंता रूबिया शेख, साईआदर्श मल्टिस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेश भांड, डॉ. निसार शेख आदी मान्यवरांच्या हस्ते साईशान स्वस्त औषधी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
साईशानचे संचालक आसिफ व सुमय्या इनामदार यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. बाळासाहेब पुलाटे यांनी जनेरिक औषधीबद्दल समाजात असणारे समज, गैरसमज याविषयी माहिती देत जनेरिक औषधी वापर करण्याचे आवाहन केले.
जनेरिक औषधी रूग्णांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष मनोहर पोकळे यांनी इनामदार परिवाराचे आभार मानत शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी डॉ. शैलेंद्र केदार, डॉ. प्रियदर्शिनी केदार, डॉ.शैलैश व डॉ. सायली पोतनीस, अधीक्षक अभियंता खाडे, उपकार्यकारी अभियंता सायली पाटील, हानिफ शेख, अकबर शेख, वा. ना. राक्षे, मनोज भुसारी, अश्‍विन गडाख, हमीद इनामदार, मुन्शी इनामदार, खतीब इनामदार, कासम इनामदार, रफीक इनामदार, मुनीर शेख, आजिज शेख, प्रा. अरफान शेख, बशीर शेख, गणीभाई शेख, मुश्ताक शेख आदी उपस्थित होते. अमिन इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*