Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकरोना होऊन गेल्यावर शरीरात प्रतिद्रव्य (अँटीबॉडी) तयार होतात, मग लस घेणे गरजेचे...

करोना होऊन गेल्यावर शरीरात प्रतिद्रव्य (अँटीबॉडी) तयार होतात, मग लस घेणे गरजेचे का आहे?

एखाद्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमतेला तयार करण्याचे काम लस करते. लसीमध्ये निष्क्रिय किंवा मृत पावलेले त्या विषाणूचे काही भाग असतात. असे असले तरी ते तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी करून तुम्हाला आजारी पाडणार नाही.

लस घेतल्यावर बी लिम्फोसाईट पेशी – ज्या तुम्हाला आजारापासून सुरक्षित ठेवतात त्या लसीमधील अँटीजेन ओळखतात (अँटीजेन म्हणजे त्या विषाणू किंवा बॅक्टेरीयाच्या बाह्य भागावरील प्रोटीनचे आवरण). त्या पेशींना असे वाटते कि खरोखर संसर्गजन्य जीव किंवा बॅक्टेरीया शरीरात आला आहे लसीमधील अँटीजेनला प्रतिसाद देण्यासाठी त्या पेशी एकसारख्या सामान पेशींचे सैन्य तयार करते. क्लोन पेशी दोन वेगळ्या प्रकारच्या पेशी विकसित करतात. 1) प्लाझ्मा पेशी 2)मेमरी पेशी.

- Advertisement -

प्लाझ्मा पेशी अँटीबॉडी तयार करतात ज्या नवीन विषाणूंवर हल्ला करतात आणि त्याला निष्क्रिय करतात. शरीर लस घेतल्यावर दोन आठवडे प्लाझ्मा आणि मेमरी पेशी तयार करत असतात. पण काही काळ गेल्यावर अँटीबॉडी नाहीशा होऊन जातात. पण मेमरी पेशी त्या विषाणूला लक्षात ठेवतात व जेव्हा पुन्हा हा विषाणू शरीरात येतो तेव्हा त्या खूप वेगाने गुणाकार करतात आणि प्लाझ्मा पेशी निर्माण करतात आणि प्लाझ्मा पेशी खूप मोठ्या संख्येने अँटीबॉडी तयार करतात.

ज्यांना करोना होऊन गेला त्यांचा शरीरात मेमरी पेशी असतील पण आता जो करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यात नवीन प्रकार येत आहेत. मागे साऊथ आफ्रिका, युके, ब्राझील मधून नवीन स्ट्रेन भारतात आले होते. आता डबल म्युटंट हा प्रकार नवीन आहे. त्यामुळे ह्या विषाणूमध्ये अजून किती तीव्रता आहे हे आपल्या शरीराला माहित नाही. त्यामुळे धोका न पत्करता लस घेतलेली बरी.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना मीनाक्षी खांडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या