सकाळचा नाश्ता कसा असावा?

कोणते पदार्थ खावेत?
सकाळचा नाश्ता कसा असावा?

रात्रीच्या जेवणानंतर तीन तासाने अन्न पचन होते . रात्री साधारण 6 ते 8 तासाच्या झोपेनंतर आपण उठतो त्यानंतर सकाळी मलविसर्जन व्यवस्थित झाले की पोट रिकामे असते.

यामुळे पोटातील अग्नी प्रज्वलित होतो अन् अन्न पचन व्यवस्थित होते. म्हणूनच सकाळचा नाश्ता नेहमी भरपेट करावा. दिवसभराची ऊर्जा आपल्याला ह्या सकाळच्या न्याहारीतून मिळत असते.

सकाळचे हे आपले पहिले अन्न असते त्यामुळे ते पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असले पाहिजे. काही लोक नाष्टा न करताच राहतात हे खूप चुकीचे आहे. नाश्ता कधीच चुकवू नये.

सकाळी नाश्त्याला तुम्ही आपले पारंपरिक भारतीय पदार्थ पोहे, शिरा, धपाटे, धिरडी, थालिपीठं, उपमा, इडली, डोसे खाऊ शकता.

चहा कमी प्रमाणात किंवा शक्यतो नाही घेतलात तर उत्तम त्या ऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी उत्तम.

चहा चपाती खाऊ नका फुकट असिडीटीला आमंत्रण आहे.

क्वोरा (quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर प्रशांत यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सारिका नितीन यांनी ही माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com