आरोग्यदूत : करोना – अफवांवर विश्वास ठेऊ नका
आरोग्यदूत

आरोग्यदूत : करोना – अफवांवर विश्वास ठेऊ नका

Balvant Gaikwad

करोना विषाणू- सवर्साधारण माहिती –

करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स (डर्शींशीश अर्लीींश ठशीळिीरीेीूं डूपवीेाश) किंवा मर्स (चळववश्रश एरीीं ठशीळिीरीेीूं डूपवीेाश) यासारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.

करोना विषाणू आजाराची लक्षणे

ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशीे निगडीत असतात ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात.

करोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा ?

करोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी सवर्साधारणपणे हा आजार हा हवेवाटे शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे.
करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.

करोना आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

सध्या महाराष्ट्रात या आजाराची लागण झालेली नाही. तथापि खालील खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

1) श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तींशी संंपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.

2) हात वारंवार धुणे.

3) शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रूमाल अथवा टिश्यू पेपर धरणे.

4) अधर्वट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.

5) फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.

खाली नमूद केलेल्या व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
श्वसनास त्रास होणार्‍या व्यक्ती आणि हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे, हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास.

प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.

नवीन करोना विषाणू- उपाययोजना आणि सद्यस्थिती –

31 डिसेंबर 2019 रोजी चीन देशातील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे रुग्ण आढळले असून 29 फेबु्रवारी 2020 पर्यंत जगामध्ये एकूण 85403 रुग्ण आणि चीनमध्ये 79394 रुग्ण आढळले असून 2838 मृत्यू झाले आहेत. चीनच्या बाहेर भारतासह श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड, दक्षिण कोरीया, अमेरिका, फ्रान्स, इराण, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, स्पेन, डेन्मार्क, पाकिस्तान इत्यादी 53 देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत. जगातील चीन व्यतिरिक्त जपान मध्ये-5, फ्रान्स-2 व फिलिपाईन्स येथे 1 व रिपब्लिक ऑफ कोरीयामध्ये 17 व इराण 34 आणि व इटलीमध्ये 21 मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये या आजाराचे 3 रुग्ण आढळले आहेत.

करोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात पुढील उपाययोजना राबवण्यात येत आहेत –

1. आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग –
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणार्‍या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील 21 विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा कस्तुरबा रुग्णालय मुंबई तसेच नायडू रुग्णालय पुणे येथे करण्यात आली आहे.

2. बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा –
जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत, त्यांची माहिती दैनंदिन स्वरुपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकार्‍यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळवली जाते. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो, त्यांच्यामध्ये करोना आजारसदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबतदेखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

3. प्रयोगशाळा निदान व्यवस्था – नवीन करोना विषाणू आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्ण कोणास म्हणावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट सूचना दिलेल्या असून त्याचे पालन करण्यात येत आहे. कोणत्याही संशयित रुग्णाचे प्रयोगशाळा नमुना एनआयव्ही पुणे यांना पाठिवताना तो एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम महाराष्ट्र यांच्या अनुमतीने पाठवणे आवश्यक आहे.
एनआयव्ही पुणे व्यतिरिक्त आता राज्यातील दोन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये (व्ही. आर. डी. एल.) देखील करोना निदानाची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे या नवीन प्रयोगशाळा आहेत.

4. विलगीकरण आणि उपचार व्यवस्था –
संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांसाठी विलगीकरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित होत आहे.

5. खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत मागदर्शक सूचना –
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात खासगी रुग्णालयांमध्ये देखील विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी हॉस्पिटल चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे.

6. आरोग्य शिक्षण – राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता, वैद्यकीय, व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे.

7. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन – सोशल मीडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश
हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

8. करोना नियंत्रण कक्ष – सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक करोना विषयक
शंका, समाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन (020 -26127394) करण्यात आला असून तो सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीत कार्यरत आहे. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सावजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहेत. थोडक्यात असे की, आपण आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधवा.

Deshdoot
www.deshdoot.com