आरोग्यदूत : मानेचे  दुखणे
आरोग्यदूत

आरोग्यदूत : मानेचे दुखणे

Balvant Gaikwad

डॉ. नीलेश लोढा, एमबीबीएस.
एम.डी. -पेन फिजिशियन
मो. 9423966968

आधुनिक जीवनशैली मानवी शरीरात अनेक आजारांना निमंत्रण देते. बैठे काम, कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप व व्यायामाचा अभाव, चुकीच्या बसण्याच्या सवयी या बाबींमुळे मानेच्या अनेक समस्या उद्भवतात. मानदुखी हा त्यातलाच एक महत्त्वाचा आजार आहे. पुरुषांमध्ये व बहुतांश कार्यालयीन काम करणार्‍या तरुण व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. आजच्या या लेखात मानेचे दुखणे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

पेन क्लिनिकमध्ये मानेच्या अनेक आजारांवर विना शस्त्रक्रिया संपूर्णत: भूल न देता उपचार केले जातात.
मानदुखीची कारणे – आपण वर विचारात घेतली आहेत. परंतु, डायबिटीस व ऑस्टिओआरथ्रायटिस हाडाची झीज, ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. दोन मणक्यातील सांध्याची झीज होणे, मणका सटकणे आदी.

लक्षणे – मानेत दुखणे, मानेचे दुखणे खांद्यात अथवा दंडात येणे, मानेचे दुखणे संपूर्ण हातात येणे, हाताला मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे, हातातून वस्तू सुटणे सारखी मान मोडणक्याची इच्छा होणे, कधी चक्कर येणे, डोकेदुखी होणे आदी स्पाँडिओलिसीसची लक्षणे असू शकतात.

उपचार पद्धती – मानेतील गादी सरकल्यामुळे जर नस दाबली जात असेल तर एपिज्युरल इंजेक्शन (उर्शीींळलरश्र एळिर्वीीरश्र) द्वारे ती नस मोकळी करता येते. मणक्यातील सांध्याची झीज झाली असेल व फक्त मणक्यात दुखत असेल; परंतु, मुंग्या वगैरे हाताला काही त्रास जाणवत नसेल तर रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे हा सांधा वेदनारहित करता येतो.
फायदे- या उपचार पद्धती विनाशस्त्रक्रिया व एक दिवसाच्या आहेत. पूर्ण भूल द्यावयाची गरज पडत नाही. काहीही साईड इफेक्ट नाहीत. कारण ते उपचार सी-आर्म मशीनद्वारे केल्या जातात. औषधांचे प्रमाण योग्य असल्याने इतर अवयवांवर परिणाम होत नाही.

काळजी – यानंतर फिजिओथेरपीच्या सल्ल्याने योग्य व्यायाम नियमित केल्यास पुन्हा त्रास उद्भवत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com