प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात आता बीएएमएस डॉक्टर

0

फॅमेली डॉक्टर संकल्पना राबविणार,13 प्रकारातील उपचार मिळणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारच्या पुढाकारातून राज्यातील 21 जिल्ह्यांत आयुष्यमान भारत आरोग्यवर्धीनी केंद्र योजनेत सामुदायिक आरोग्य अधिकारी नेमण्यात येणार आहेत. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर यांची नेमणुक करण्यात येणार असून हे डॉक्टर त्यात्या उपकेंद्राच्य परिसरात रुग्णांना 13 प्रकारच्या आरोग्य सुविधांचा लाभ देणार आहेत. सरकारने आयुष्यमान भारत आरोग्यवर्धीनी केंद्र योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यातून या योजनेत 801 डॉक्टरांची निवड करण्यात येणार असून निवडीपूर्वी या डॉक्टरांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधीत त्यांना 10 हजार रुपये प्रती महिना मानधन देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या बीएएमएस डॉक्टरांची आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांच्या मार्फत परीक्षा घेेेण्यात येणार असून त्यानंतर या डॉक्टरांना नेमणुका देण्यात येणार आहेत. या काळात संबंधीत डॉक्टरांना मासिक पगार 25 हजार रुपये देण्यात येणार आहे. हे अधिकारी संबंधीत प्राथमिक उपकेंद्राचे सामुदाायिक अधिकारी म्हणून काम पाहणार असूून उपकेंद्रातंर्गत येणार्‍या प्रत्येक गावातील दररोज दहा कुटूंबांना भेटी देऊन त्यांच्या फॅमेली डॉक्टरप्रमाणे सेवा देणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

यापूर्वीच प्रयोगिक तत्वावर पारनेर तालुक्यांतील 47 बीएएमएस डॉक्टरांची निवड करण्यात आली असून त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे डॉक्टर सेवेत दाखल होणार आहे.

या आरोग्य सेवा देणार प्रसुतिपूूर्व व प्रसुती सेवा
नवजात अर्भक व नवजात शिशुुंना दिल्या जाणार्‍या आरोग्य सुविधा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्य सेवा आणि लसीकरण सेवा, कुटूंब नियोजन, गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्य सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन व किरकोळ रोगांची बाह्य रुग्ण सेवा, ससंर्गजन्य रोग नियोजन आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, मानसिक आरोग्य तपासणी, प्रतिबंंध, नियंत्रण व नियोजन, नाक, कान, घसा व डोळे संबंधीच्या सामान्य आरोग्य सेवाा, दंत व मुखरोग संबंधी आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आत्पकालीन सेवा आणि योग व आयुर्वेद उपचार पध्दती.

LEAVE A REPLY

*