Video : आरोग्य मंत्र्यांचा मोठा दिलासा; कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत

Video : आरोग्य मंत्र्यांचा मोठा दिलासा; कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत

मुंबई: कोरोनाचे रुग्ण एकीकडे वाढत असले तरीदेखील करोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण बरे होत आहेत.

सध्या केवळ दोनच करोनाबाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित कर होते. ते म्हणाले, ‘मी घरी थांबणार, मी करोनाला हरवणार’ हा पण आपण सगळ्यांनी करूया. उद्या गुढीपाडवा सण आहे. या निमित्ताने आपण करोनावर मात करण्याचा. या विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवण्याचा संकल्प करूया, असेही टोपे म्हणाले.

कोरोनासंदर्भात आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती

 कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत ही समाधानाची गोष्ट
 कोरोनाचे दोन रूग्ण आयसीयूत असून इतरांची प्रकृती स्थिर
 पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने बघू नका
 कोणत्याही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये
बाधित लोकांशी माणुसकीने, आपुलकीने वागा अगदीच माणुसकी सोडून वागू नका
 महाराष्ट्रातील तीनच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, फिलिपाईन्सचा नागरिक कोरोना निगेटिव्ह.
कोरोना बरा होऊ शकतो

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com