Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महापालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त पदांची लवकरच भरती – एकनाथ शिंदे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महापालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त पदांची भरती तत्काळ केली जाईल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात येईल जेणेकरून आचारसंहितेच्या कचाट्यात भरती प्रक्रिया अडकणार नाही.

महापालिकेने रिक्त पदांबाबत अहवाल सादर करावा. आरोग्य विभागाकडून जी काही मदत करता येईल ती करेल असे राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर तत्काळ उपचार मिळावा यासाठी बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरु करा असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

शनिवारी (दि. २०) शिंदे यांनी महापालिकेला भेट देऊन आरोग्य विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉ. कमतरता, शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोके वर काढलेला स्वाईन फ्लू, डेंग्यू, ,मलेरिया या साथीच्या रोगांची माहिती घेत उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

तसेच शहरात ज्या ठिकाणी पाणी साचते अशी ठिकाणे निश्चित करून तेथे स्वच्छतेवर भर द्यावा. साथीच्या रोगांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, शहरातील बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी साचून डेंग्यू, मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आदेशित केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!