Friday, May 3, 2024
Homeनाशिकलासलगांव बाजार समिती सेवकांना आरोग्य विमा कवच

लासलगांव बाजार समिती सेवकांना आरोग्य विमा कवच

लासलगांव | वार्ताहर

कोवीड-19 व इतर सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी लासलगांव बाजार समितीने कायमस्वरूपी व रोजंदारीवर असलेल्या कर्मचा-यांचा आरोग्य विमा काढला असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

- Advertisement -

बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर तसेच तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर कामकाज करणारे कायमस्वरूपी व रोजंदारीवरील सेवक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोवीड-19 व इतर सर्व प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी कोणतीही आर्थिक व्यवस्था नसल्याने उपचारासाठी पैशांची निकड भासु नये ही बाब विचारात घेऊन बाजार समितीमार्फत सर्व 141 कर्मचा-यांचा स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्स कंपनीकडुन आरोग्यविमा काढला असल्याचे जगताप यांनी सांगितले.

बाजार समितीच्या कायमस्वरूपी सेवकांना पाच लाख रकमेपर्यंत व रोजंदारीवरील सेवकांना तीन लाख रकमेपर्यंत वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळणार आहे.

ही विमा पॉलिसी ही कॅशलेस असुन नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामांकीत रूग्णालयात या विमा पॉलिसीद्वारे सेवकांना उपचार घेता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या