Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आरोग्य जपणारी अ‍ॅप्स ठरताहेत लोकप्रिय

Share

नाशिक | प्राजक्ता नागपुरे

दिवाळी अवघ्या सात दिवसांवर आल्याने बाजारात कपडे, दागिने खरेदी, फराळाचे निरनिराळे पदार्थ यांची उलाढाल सुरू झालेली दिसते. सोबतच सणावरांच्या दिवसात आपले व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसावे याकडे अनेकांचा ओढा असल्याचे जाणवते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपले आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकालाच रोज जिम अथवा जॉगिंग ट्रॅकसारख्या ठिकाणी जाणे शक्य होत नसल्याने अनेक फिटनेसप्रेमी घरच्या घरीच व्यायाम करण्यास पसंती देत आहेत.

तंत्रज्ञानाच्या स्मार्ट युगात प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल आरोग्याची काळजी घेण्यात मदत

करत आहे. त्यामुळे आता रोजच्या दैनंदिन कामाच्या गोष्टींचे रिमाइंडर लावण्यापासून ते बिलं भरणे, खरेदी करायच्या वस्तूंच्या याद्या करणे ते अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची आठवण करण्यासाठी वापरला जाणारा स्मार्टफोन रोजच्या व्यायामात ट्रेनरची भूमिका बजावतांना दिसतो.

स्मार्टफोनचे प्लेस्टोर जरा चाळले तर अनेकविध हेल्थ अ‍ॅप्स दिमतीला उभे असतात.  हे अ‍ॅप्स झोपेच्या वेळेपासून, पाणी पिण्याच्या वेळा यांची माहिती दिली जाते.  तसेच,  प्रत्येकालाच योगासनांच्या वर्गाला जाणे शक्य नसते. योगासनांची प्रात्यक्षिकांची चित्रफीत, आकृत्या दाखवणारी अ‍ॅप आता स्मार्टफोनवर आहेत. कोणते आसन कसे करावे, ते करताना काय खबरदारी घ्यावी, त्याचे फायदे काय होतात याची माहिती यावर उपलब्ध आहे. यातील काही अ‍ॅप पूर्ण मोफत, तर काही अ‍ॅप्ससाठी शुल्क आकारलं जातं.  जाणून घेऊया अशाच काही आरोग्यदायी अ‍ॅप्सबद्दल…

सेव्हन मिनिट्स

व्यग्र वेळापत्रकात खूप वेळ व्यायामासाठी देता येत नाही, मात्र कमीत कमी वेळात म्हणजे फक्त सात मिनिटात व्यायाम करून फिट राहता येईल असे अ‍ॅप म्हणजे सेव्हन मिनिट्स. हे अॅप वापरायला आणि समजायला अगदी सोपं आहे. यातल्या खूप साऱ्या व्यायाम प्रकारातून तुम्ही तुम्हाला जमेल असा व्यायाम प्रकार निवडू शकता. प्रत्येक प्रकारच्या सूचना आणि व्हिडिओज तुम्हाला या अॅपमध्ये बघायला मिळतील.

 

माय फिटनेस पाल

अनेक फिटनेस तज्ञांनी सुचविलेले हे अ‍ॅप असून, फिट राहण्यासाठी जी काही माहिती लागते ती बहुतेक सर्व या अॅपवर देण्यात आली आहे. तुम्ही एकदा या अॅपमध्ये लॉग इन बनवलं तर हे अॅप तुमच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे तुम्हाला किती कॅलरी लागेल हे सुचवते. यात असलेल्या प्रोग्रेस टॅबमध्ये तुमची दैनंदिन प्रगती तुम्ही सहज पाहू शकता. तुमचे जेवण त्यातले कॅलरी सगळे तुम्ही यात नोंदवू शकता. यात विविध रिमाइंडरसुद्धा आहेत. तसेच आरोग्याशी निगडित यशोगाथा या अॅपवर वाचता येतात.

३० डे फिटनेस’, ‘फिटनेस’, ‘जिम वर्क आऊट’, ‘स्टेप्स ट्रॅकर’ ही अ‍ॅप्स सकाळी उठल्यापासून तुमच्या शरीराची किती हालचाल झाली, त्यातून किती ऊर्जा खर्च झाली अशा अनेक गोष्टींचा लेखाजोखा ठेवून एकत्रित उपलब्ध करून द्यायचं काम काही अ‍ॅप्स करतात. दिवसभर तुम्ही किती किलोमीटर चाललात, किती मिनिटं चाललात, या चालण्यात तुमचे किती उष्मांक खर्च झाले त्याची नोंदही अ‍ॅप्स ठेवतात. त्यामुळे व्यायाम आणि फिटनेसविषयी जागरूक असलेल्या तरुणांसाठी, गृहिणींसाठी ही अ‍ॅप्स उपयोगी पडतात.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!