Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणार; नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचा निर्णय

एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणार; नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचा निर्णय

नाशिक। प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष साहेबराव कुटे यांनी दिली.

- Advertisement -

सध्या सर्वत्र कोविड 19 या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे.यासाठी शासन स्तरावर उत्तम प्रयत्न केले जात आहेत,त्यासाठी समाजाचाही मोठा सहभाग असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यानी त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सने चर्चा केली.

त्यानुसार नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आपले एक दिवसाचे वेतन देण्यास स्वताहून तयार आहे.

त्यासंबंधीचे आदेश शिक्षण विभागास द्यावेत,तसेच आपल्या विद्यालयातील शिक्षकांनाही तशी विंनती केली आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.के. अहिरे,कार्यवाह आर.डी. निकम,कार्याध्यक्ष साहेबराव कुटे यांनी दिली. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सर्व पदाधिकार्यानी त्यास सहमती दिली असल्याचीही माहिती साहेबराव कुटे ह्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या