Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करणारा मुख्याध्यापक अटकेत

Share
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, nashik crime news rape on fourteen year girl breaking news

सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील धोंडबार येथील आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाकडून अत्याचार करण्यात येत असल्याची तक्रार 3 विद्यार्थीनींनी महिला सुरक्षा विभागाच्या दामिनी पथकाकडे केल्यानंतर सदर मुख्याध्यापकाच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह व अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या दामिनी पथकाने आपापल्या परिसरातील शाळा-कॉलेजसह आश्रम शाळांना भेटी देऊन विद्यार्थीनींवर होणार्‍या अत्याचारांबाबत जागृत करण्याची मोहिम सुरु केली आहे.

याचाच भाग म्हणून महिला पोलीस निरीक्षक अश्विनी टिळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने धोंडबार येथील शासकीय आश्रम शाळेस भेट देऊन विद्यार्थीनींसी संवाद साधला. मुलींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचे सोबत होत असलेल्या अपकृत्यांबाबत 3 पिडीत विद्यार्थीनींनी आपल्यावरील आपबिती पथकाला सांगितली.

या पथकाने विद्यार्थीनींची तक्रार नोंदवून घेत आश्रम शाळेचा मुख्याध्यापक राजेंद्र ब्रिजलाल राऊत याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात आज (दि.30) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!